भाषा: मराठी
गळ्यात लाल पट्टा असलेलं छोटंसं काळंभोर मांजरीचं पिल्लू कोळसू चार फुलांमध्ये बसलं आहे. त्याच्या डोक्यावर एक हिरवा बेडूक बसला आहे आणि जवळच एक निळं फुलपाखरू उडत आहे.

कोळसू

3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी एक कार्टून. प्रत्येक भागात छोटंसं काळंभोर मांजरीचं पिल्लू कोळसू आपल्या मित्रांसोबत काही नवीन शब्द शिकतं.

YouTube वर मोफत, 29 भाषांमध्ये ऐकता येतं.

YouTube वर पाहारंग भरण्याचं पान प्रिंट करा

सर्व भाग

भाग 1

कोळसू आणि निळं फुलपाखरू

रंग: पिवळा, लाल, निळा, हिरवा

आपला छोटासा मित्र कोळसू म्हणजे एक काळंभोर मांजरीचं पिल्लू. तो एका निळ्या फुलपाखरामागे बागेत जातो आणि चार रंग शोधतो: पिवळा, लाल, निळा आणि हिरवा!

एकत्र पाहताना तुम्ही विचारू शकता: “तुला घरात काहीतरी निळं सापडेल का?”

भाग 1 पाहा10 मिनिटे

प्रिंट करण्यासाठी पानं

  • रंग भरण्याचं पान 1, कोळसू आणि निळं फुलपाखरूरंग भरण्याचं पान 1A4US Letter
  • रंग भरण्याचं पान 2, कोळसू आणि निळं फुलपाखरूरंग भरण्याचं पान 2A4US Letter
  • रंग भरण्याचं पान 3, कोळसू आणि निळं फुलपाखरूरंग भरण्याचं पान 3A4US Letter
  • रंगांच्या जोड्या लावा, कोळसू आणि निळं फुलपाखरूरंगांच्या जोड्या लावाहे पान रंगीत प्रिंट करा.A4US Letter

भाग 2

कोळसू आणि हिरवा बेडूक

तळ्यातले प्राणी: बेडूक, बदक, मासा, कासव

काळंभोर मांजरीचं पिल्लू कोळसू तळ्याकाठी असतं, तेवढ्यात एक इवलासा हिरवा बेडूक टुणकन उडी मारून त्याच्या नाकावर येऊन बसतो! कोळसूला त्याच्याशी खेळायचं असतं, पण बेडूक पाण्यात उडी मारून लपून बसतो; त्याला शोधताना कोळसूला भेटतात एक बदक, ज्याचा आधी फक्त लव्हाळ्यातून आवाज येतो, एक मासा, ज्याचे फक्त पाण्यातले बुडबुडे दिसतात, आणि एक कासव, जे दगडासारखं दिसतं... पण तो दगड तर चालायला लागतो!

एकत्र पाहताना तुम्ही विचारू शकता: “बदक कसं करतं?”

भाग 2 पाहा10 मिनिटे

प्रिंट करण्यासाठी पानं

  • रंग भरण्याचं पान 1, कोळसू आणि हिरवा बेडूकरंग भरण्याचं पान 1A4US Letter
  • रंग भरण्याचं पान 2, कोळसू आणि हिरवा बेडूकरंग भरण्याचं पान 2A4US Letter
  • रंग भरण्याचं पान 3, कोळसू आणि हिरवा बेडूकरंग भरण्याचं पान 3A4US Letter
  • सावल्यांच्या जोड्या लावा, कोळसू आणि हिरवा बेडूकसावल्यांच्या जोड्या लावाA4US Letter

आई-बाबांसाठी

प्रत्येक भाषेत कोळसूचं स्वतःचं एक नाव आहे